तुम्हाला माहिती आहेत का हो आणखी काही ऐकलेले/स्वतः तोडलेले तारे?

हो.... हल्लीच एका विपत्रातून गायीवर निबंध (ढकलम् पंची करीत आलेला) बघितला:

अमेरिकेत मुलाला गाय असे म्हणतात; भारतात गवत खाणाऱ्या प्राण्याला गाय म्हणतात.
गायीला चार पाय व दोन कान असतात. गायीचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते.
गायी फावल्या वेळात शेपटीने माशा मारतात. मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात ते टेस्टी असते.
गायी गोठ्यामध्ये गाई गाई करतात.
गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो.
गायीच्या शी ला शेण असे म्हणतात, शीलाताई शेणाच्या गौऱ्या करते.
गायीच्या पिलाला वासरु असे म्हणतात, वसुबारसला वासराचे बारसे करतात.
गायीची पुजा होते, पुजा मला आवडते, ती माझ्या शेजारी बसते.
गायीला माता म्हणतात.
भारत माता की जय !