काठीपेक्षा तिची चांदीची मूठ हाताला थंड का लागते?

उत्तर:-जसेजसे वर जावे तसतशी हवा थंड होते. अर्थात काठीपेक्षा मूठ थंड असणारच!.

----------------

भारमापक(बॅरॉमीटर) वापरून एका उंच मनोऱ्याची उंची कसी मोजाल?

उत्तर : (१) मनोऱ्यावरून एका दोरीला बांधून भारमापक जमिनीला टेकेपर्यंत खाली सोडीन.  वर ओढून वापरलेल्या दोरीची लांबी मोजीन.  (२) भारमापकाचा पट्टीसारखा उपयोग करून भिंतीवरून 'एक दोन 'करीत मनोऱ्याच्या टोकापर्यंत जाईन . भारमापकाच्या लांबीला त्या संख्येने गुणून उंची मिळेल.  (३) मनोऱ्याच्या शिखरावरून भारमापक खाली टाकीन. स्टॉपवॉचवर खाली पडण्याची वेळ नोंदवीन. न्यूटनच्या नियमानुसार आकडेमोड करून उंची काढीन.