'बाबा त्रिकाल',
आपणास तीन प्रश्न:
१. मराठी माणसे महाजालावर सामाजिक भान फारसे (व इतर काही प्रांताच्या तुलनेने कमी) दाखवत नाहीत असे आपले म्हणणे आहे. पण आपण स्वतः अशा काही प्रश्नांना घेवून चर्चा चालू केलीत का? किंवा अशा चर्चेत भाग घेतला आहेत का? का आपली भूमिका नुसतीच नकारात्मक आहे?
२. आपले म्हणणे, विशेषतः इतर प्रांतियांच्या तुलनेच्या संदर्भात, बरोबर आहे असे मानून चालू. पण मग आपण हेहि सांगा की जिथे अशा सामाजिक विषयांवर चर्चा झाल्या, तिथे त्यांचे फलित काय निघाले?
सर्वसाधारणपणे मराठी माणसांना सामाजिक भान बरेच असते. म्हणूनच महाराष्ट्रात अनेक सामाजिक प्रबोधनाच्या चळवळी वर्षानूवर्षे चालू आहेत. त्यातील काही व्यक्तिगत स्वरूपाच्या आहेत, हे खरे. पण अशा चळवळी व्यक्तिगत स्वरूपाने चालवावयालाही आजूबाजूच्या समाजाचे सहकार्य लागते. म्हणजे एकंदरीत मराठी समाजाला इतर बऱ्याच, विषेशतः हिंदीभाषिक प्रांतातील समाजापेक्षा सामाजिक भान चांगले आहे. तर ई-संबधातच तो अलिप्त असेल, असे मानने जरा कठीण वाटते. तेव्हा (हे जर मान्य असेल तर, आपणाला हा विरोधाभास का आहे असे वाटते?) का मराठी समाजाबद्दलचे माझे हे म्हणणेच आपणाला पटत नाही?
३. हिंदी भाषीक प्रदेशांतील मंडळीत जे ई-वादविवाद आपण अनुभवलेत, ते खरोखरीच सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात होते, के निव्वळ राजकारणाशी संबंधित होते?
...प्रदीप