साने गुरुजींना उणेपुरे ५० वर्षाचे आयुष्य लाभलेले होते. त्यात १३ वर्ष वेगवेगळ्या कारावासात गेले. राहिलेल्या वर्षात त्यांनी एकूण ५० कथा-कादंबऱ्या लिहिल्यात. त्यांचे मुलावरील प्रेम, आंतरभारतीचा प्रकल्प इत्यादी बद्दल जितके लिहावे तितके कमीच आहे.

माधवरावांनी या आगळ्यावेगळ्या पद्धतीने गुरुजींचे स्मरण केले आहे त्याबद्दल ते प्रशंसेस पात्र आहेत.