श्री. अभिजित_गोखले,
मन:पूर्वक धन्यवाद. 'प्रभाकर' पुढे 'जी' नको.
श्री. प्रशांत,
माझ्या इवल्याशा साहित्यकृतीचे तोंडभरून कौतुक करून मला तुम्ही संकोचीत केले आहे. कथा वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
श्री. विनायक,
मी 'जोनाथन लिविंग्स्टन सीगल' चे वाचन कधी केल्याचे स्मरत नाही. माझ्या कथेतील निरिक्षणे आणि कल्पनाविस्तार माझा स्वत:चा आहे (अर्थात हे आपण मान्य केले आहेच.) थोडी फार माहीती 'महाजाला'वरून आलेली आहे. (पक्षी शहरातून येणार्या विविध वासांवरून स्वत:च्या घरट्याकडे मार्गक्रमण करतात.) आपल्या अंतरंगातील सहनशील वाचकास मन:पूर्वक धन्यवाद.
जया केन्डे,
बोलणं आणि लिहीणं हे माझे शौक आहेत. आपल्या सारख्या वाचकांच्या कौतुकातून ह्या माझ्या शौकांना (हा अनेकवचनाचा घोळ आहे) प्राणवायू मिळतो.
विविध अळ्यांचे खाणे आणि कावळ्यांच्या जाती-पोट जाती हा कल्पनाविलास आहे. (पण कावळ्यांमध्ये असे कांही असावे असे मला प्रामाणिकपणे वाटते.)
पक्षांचे आणि प्राण्यांचे जग आपल्यापेक्षा अगदी भिन्न असले तरी ते या ग्रहावरचे आपले सहजीव आहेत. त्यांच्या आणि आपल्या जीवनात परस्परावलंबित्व हा समान धागा आहे. त्यांच्या 'नजरेतून' माणूसजातीकडे पाहाणे, त्यांच्या लकबींचा, वागण्याचा अन्वयार्थ लावणे हा छंद आपल्याला त्यांच्या अधिक जवळ घेऊन जातो. त्यांच्या बद्दल 'वेगळा' विचार करण्यास भाग पाडतो. आपल्या व्यक्तीमत्वात सकारात्मक बदल घडवून आणतो, असं मला वाटतं.
कथा वाचून आवर्जून अभिप्राय दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद. आपल्या सदिच्छा पाठीशी असल्यावर नवनविन विषयांवर लेखन करण्यास प्रोत्साहन प्राप्त होईल यात शंका नाही.
श्री. सर्वसाक्षी,
कावळा हा उपेक्षित पक्षी आहे ही खरी गोष्ट आहे. पण तो 'अनाकर्षक' आहे या विधानाशी मी सहमत नाही. त्याच्या कडे निरखून पाहीले तर 'Black is beauty' हे पटतं. तरूण आणि निरोगी कावळा अत्यंत आकर्षक दिसतो. काळेभोर पाणीदार डोळे, तुकतुकीत आणि चकचकीत काळी पिसं (अगदी 'कावळ्यासारखी आंघोळ' करूनही), डौलदार बसणे आणि 'काक-दृष्टी' ही त्याची वैशिष्ट्य आहेत. हं.. आवाज कधी कधी कर्कश्य वाटतो. पण, पहाटेच्या वेळी? .... हाच आवाज कोकीळेच्या आवाजापेक्षा गोड वाटतो. (ज्यांच्या घराजवळील झाडांवर कोकीळेचे वारंवार येणे असते त्यांना पटेल की, प्रसंगी कोकीळेचे केकाटणेही 'असह्य' होते.)
आपण माझी कथा वाचून आपला अभिप्राय कळविलात खूप बरे वाटले. असेच कौतुकाचे अत्तर आपुलकीने लेखकाच्या हाती लावावे, नवनवीन विषयांवर लिहीण्यास प्रोत्साहन प्राप्त होते.
धन्यवाद.