जातीयवाद मग तो कोणत्याहि ठिकाणी असला तरी निषेधार्हच. परंतु राज्यघटनेनेच मान्य केल्यावर जाति जातील कोठे?  आर्थात आपण आपल्या मनातून पूर्वग्रह काढून टाकू शकलो आणि निकोप मनाने वावरू लागलो तर जातींचा प्रश्न त्रास देणार नाही. मनोगतात लिहितांना वा वाचतांना जात ओळखू येणे शक्य असेल असे मला वाटत नाही. लिखाण प्रकाशित करतांना जर जात विचारली जात असेल तर आक्षेपार्ह! परंतु तसे घडत असेल हे शक्य नाही. आणि समजा असे होत असेल तर "तू नही तो और सही" या न्यायाने आपले स्वतंत्र व्यासपीठ  निर्माण करायची हिंमत बाळगायला हवी पण आत्मत्रागा करीत बसू नये.