घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया, दुःखाचीही अशी लागते अनवट माया
आक्रसताना जग भवतीचे इवले झाले, इवले झाले आणिक मजला घेरित आले

काळोखाच्या छाया कशा तर 'वत्सल'!

ह्या ओळींतील दुखा:च्या जवळिकेची जाणिव खूपच धारदार आहे. एव्हढी टोकदार नव्हे, पण तशीच थोडीफार सल कैफ़ी आझमींच्या ह्या ओळीमध्ये आहे:

ओ बेकरार दिल, हो चुका है मुझको आसूओसे प्यार, मुझे तू खुशी न दे, नयी जिंदगी न दे

मिली चमन को बहार, हंसी फूल को मिली, गीत कोयल को मिले, और मैने पायी खामोशी,

मुझे बांसूरी न दे, नयी रागिनी न दे...

अपार काळ्या दुखा:च्या छयेत गडद झालेल्या दोस्तोयव्स्कीच्या कादंबऱ्यांचीही येथे आठवण आल्यावाचून रहात नाही. नंदन व परिमी, धन्यावाद!

आणि नंदन, मर्ढेकरांच्या कवितांवरचा लेख लिहाच, आम्ही येथे मनोगतावर वाट पाहू.

प्रदीप