काय सुरेख लिहीलय... लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत मस्त आमरस-पोळीचे जेवण झाल्यावर, मोठी माणसे झोपल्यावर, आम्हा मुलांचे अंगणाच्या झाडाखाली पत्त्यांचे कितीतरी डाव रंगायचे.. भिकार-सावकार!,झब्बू का तत्सम नावाचा खेळ, रमी,पाच-तीन-दोन,चॅलेंज,बदाम-सात,लॅडीज,नॉट-ऍट-होम,मेमरी,सगळ्यात महत्त्वाचा आणि रंजक खेळ 'तीनशे-चार'!! आख्खी दुपार निघून जायची तरी आम्ही खेळत असायचो... कधीकधी कॅरम सुद्धा असायचा! संध्याकाळ झाली की मात्र लंगडी,लपाछपी,विषामृत,फुटबॉल,बॅडमिंटन अशाच खेळांची मक्तेदारी!  व्वा मुक्तछंद, तुम्ही परत लहानपणीच्या रम्य जगात नेलं! आत्ताही तेच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पत्ते खेळावेसे वाटायला लागले आहे..कोणी मित्र-मंडळी नाही राहीली रिकामी... असो.. मस्तच लिहीलं आहे.. लिहीत रहा...