पत्ते...... खूप जणांच्या जिव्हाळ्याचा आणि तसेच् जुन्या आठवणींना ( आठवणी नेहेमी भूतकालाविषयीच् असतात मग त्यात पुन्हा त्यांना 'जुन्या' हे विशेषण का वापरतात??) उजाळा  देणारा विषय आहे....

खूप छान वाटले वाचून. वर दिलेल्या प्रतिसादांमधून बऱ्याचश्या पत्त्यातल्या खेळांची नावे आलीच् आहेत (लॅडीज, तीनशे चार, ब्रीज, बदाम-सात, सात आठ, पाच् तीन दोन इत्यादी विशेष आवडते खेळ), त्याच्या जोडीला काही विशेष नावे ती अशी : मेंढी कोट, जजमेंट (नवीन माहिती नूसार याच् खेळाला 'हिमत की किमत' असेही नाव कळले आहे), कॅनेस्टार, तीन पत्ती (डेव्हिल्स् कट सकट), पेशन्स्, फ्लश, मुंगूस, इस्पीक राणी (जो विंडोज मध्ये हार्टस् या नावाने आहे)......

खरतर 'पत्ते' हा विषय शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग करून सगळ्यांनाच् शिकवला पाहिजे! पहिली दुसरी मध्ये छोटे छोटे खेळ म्हणजे भिकार सावकार, मेमरी इत्यादी अभ्यासक्रमात ठेवून, पुढे पुढे खेळांची काठिण्यता (डिफिकल्टी!!) वाढवत ४ थी ला स्कॉलरशीपला विशेष खेळ उदा. तीनशे चार अशी पत्त्यातल्या खेळांची रचना असावी! हा हा.....धमाल.... मे महिन्याच्या सुट्टीत सर्व मुल घ.अ. खूप आवडीने करतील!!!

मजेचा भाग बाजूला पण अजुनही नविन काही मित्रांनी (ऑफीस मधील) मुंगूस, तीनशे चार, मेंढी कोट असले भारी खेळ कधी खेळलेच् नाहीत हे जाणुन निश्चितच असे वाटते की किती धमाल, गमती जमती त्यांनि अनुभवलेल्या नाहीत. अजूनही नेहेमीचा ग्रुप जमला की आम्ही मस्त पत्ते खेळतो. कधिकधितर पत्ते खेळण्याकरतासुद्धा बऱ्याच दिवसांन्नी एकत्र जमतो.

जुगार/ रमी या वर्गातील पत्त्यांचे खेळ (म्हणजेच् थोडक्यात पैसे लावून खेळायचे उदा. तीन पत्ती, फ्लश) या बद्दल खूप लोक नाक मुरडतात पण पैसे न लावता तेच् खेळ खेळता येउ शकतात. जुन्या खराब सीडी, काडेपेटीच्या काड्या इथपासून ते जुने वापरलेले पत्त्यांचे कॅट अश्या सर्व गोष्टी वापरून या खेळांचा आनंद जरुर घेता येतो.

असो....खूप छान विषय काढल्याबद्दल धन्यवाद! - अद्वय.