मूळ विषयातील तांत्रिक माहितीबरोबरच  तिच्यासोबत असणाऱ्या चित्रप्रतिमा, सारणी अशा सर्व सामग्रीतला मजकूर मराठीत आणण्यासाठी घ्यावी लागलेली मेहनत आणि तिला मिळालेले फळ पाहून आणखी सदस्यांना आपापल्या अभ्यासाच्या, अनुभवाच्या आणि हौशीच्या क्षेत्रातल्या तांत्रिक आणि वैज्ञानिक माहितीवर अधिकाधिक लेखन करावेसे वाटेल असे वाटते.

जालावर लेख लिहिताना लेखात चित्रप्रतिमा अंतर्भूत करायची असेल तर तिचे आकारमान संकेतस्थळाच्या पानाची महिरप बिघडवणार नाही इतपत मोठे राहील असे पाहावे. तसे काही कारणाने शक्य नसेल तर चित्रप्रतिमा अखंड न ठेवता तिचे अनेक भाग करून त्यांचा अंतर्भाव करता येतो का पाहावा. (हे आता येथे केलेले आहे.)