शरीरशास्त्राच्या तुलनेत लैंगिक शिक्षण हे विशिष्ट शिक्षण ठरते. लैंगिक शिक्षणामध्ये केवळ जीवशास्त्रीय शिक्षणच नव्हे, तर बदलत्या शरीराबरोबर होणारे मानसिक बदल आणि त्याबद्दलची ज़ाणीव, चाळवले ज़ाणारे कुतूहल आणि त्या जिज्ञासापूर्तीसाठी अवलंबले ज़ाणारे/आवश्यक असणारे योग्यायोग्य मार्ग यांबद्दलची जागरुकता यांचा अंतर्भाव असणे अपेक्षित असते/असावे. जीवशास्त्रात किंवा नागरीकशास्त्रात हे शिक्षण त्यामुळे समाविष्ट करता येणार नाही; करावयाचेच झाल्यास केवळ काही ठराविक मर्यादेपर्यंतच करता येईल. म्हणूनच हा वेगळा विषय असणे श्रेयस्कर, असे मला वाटते.