नमस्कार,

आजच हा लेख आणि प्रतिक्रिया वाचल्या.

>>मुलगी २७-२८ वर्षांची झाली तर ती थोराड/जून दिसायला लागते. मुले तिला नाकारतात. कारण मुलगी लहान व नाजुक असावी अशी मुलांची अपेक्षा असते.<<

हे वाक्य खटकलं. मुलगी जून दिसते मान्य... निसर्गनियम आहे. पण मग मुलगे काय दिवसेंदिवस तरुण दिसायला लागतात की काय!? तेही तेवढेच 'बाप्ये' दिसतात की!

असो. एकंदरीत लेख एकांगी वाटला मला. मी सुद्धा अरेंज्ड लग्नपद्धती खूप जवळून पाहिलीय. एकंदऱीत मनस्ताप देणारीच आहे (मुलींना व मुलांनाही). खूप बदल अपेक्षित आहेत. मीसुद्धा याच विषयावर लिखाण (माझे अनुभव) केले आहे. इथे ते पुन्हा देत नाही.  खालील लिंकवर ते वाचता येईल.

http://manasokta.blogspot.com/2006/09/blog-post_28.html

पण या विषयावर नाटक/चर्चा होणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. हा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद!