जीवन जिज्ञासा

लेख कॅट बसच्या सर्वसाधारण माहितीबद्दल नसून मी घेतलेल्या बससेवेच्या अनुभवाविषयी आहे. ती माहिती कुठल्याही दुव्यावर मिळणार नाही. आणखी एक, आपण दिलेला दुवा चुकीचा आहे. योग्य दुवा इथे पहा. त्यावर कॅट बसची माहिती सापडेल. त्यात काही नाविन्य नाही. कारण अमेरिकेतील बऱ्याच शहरात/ विद्यापीठात अशा बससेवा आहेत व त्यांची माहिती त्यांच्या आपापल्या वेब साईटस् वर आहे. अशी माहिती इथे द्यायला मनोगत म्हणजे विकीपीडिया नाही हे लक्षात घ्या.

आपल्याला हा लेख घाईघाईत लिहिला आहे असे वाटत असेल तर  हा लेख मी कसा लिहायला हवा होता याचे प्रात्यक्षिक आपण इथे दाखवावे अशी पण आपल्याला विनंती आहे. खरे तर माझेच चुकले. इ. स. २००२ मे मध्ये क्लेम्सनला जाण्याआधीच तेथील कॅट बस सेवेचा अनुभव कसा घ्यावा आणि त्यावर भविष्यात काही लिहायचेच झाले तर कसे लिहावे हे त्यावेळीच आपल्याला विचारून घ्यायला हवे होते.

रोहिणी