मी ७ वीत असतानाचा किस्सा-

सामान्यविज्ञानाची चाचणी परीक्षा होती. त्यात एक प्रश्न होता - अस्थिभंगाचे तीन प्रकार कोणते?  त्याचं उत्तर अर्थात साधा अस्थिभंग, दुसरा आता आठवत नाही आणि तिसरा गुंतागुंतीचा अस्थिभंग. तासाभरापूर्वी सरांनी शिकवल्यामुळे आम्ही सर्वांनी बरोबर उत्तर लिहिले मात्र आमच्या एका मित्राने तिसऱ्या अस्थिभंगाचे नाव न आठवल्याने लिहिले आडुमाडुचा अस्थिभंग... सर अवाक् आणि आम्ही ह. ह. लो. पो. 

आजही सर्व मित्र भेटल्यावर आडुमाडुचा अस्थिभंग हमखास आठवतो....