गजसारथी वापरताना हत्ती पेक्षा माहूत....

हाहाहाहाहाहाहा. तुषारस्नान चांगले आहे पण माहुताने काय घोडे मारले आहे सावरकरवादी शुद्धीकरणवाल्यांचे कळत नाही. तत्सम शब्दच हवेत असे का ? अशाने भाषेला एकसुरीपणा येईल. स्वा. सावरकरांनी मराठी भाषेचे नुकसान केले आहे, असे काहींना (प्रा. श्री. के. क्षीरसागर) वाटते त्यात थोडे तरी तथ्य असावेसे अशावेळी वाटते. ह्या लोकांना संस्कृतप्रचुर बामणी मराठी हवी आहे काय, असे कधीकधी वाटते.

प्रगण वगैरे वगैरे...  मूठभर लोकांनी असले शब्द रूढ करण्याचे प्रयत्न वांझोटेच ठरणार आहेत. सामान्य मराठी माणूस त्याला बोलताना त्रास होत नाही अशी मराठीच स्वीकारणार.  अती झाले हसू आले!

चित्तरंजन