आपल्याला हा लेख घाईघाईत लिहिला आहे असे वाटत असेल तर हा लेख मी कसा लिहायला हवा होता याचे प्रात्यक्षिक आपण इथे दाखवावे अशी पण आपल्याला विनंती आहे. खरे तर माझेच चुकले. इ. स. २००२ मे मध्ये क्लेम्सनला जाण्याआधीच तेथील कॅट बस सेवेचा अनुभव कसा घ्यावा आणि त्यावर भविष्यात काही लिहायचेच झाले तर कसे लिहावे हे त्यावेळीच आपल्याला विचारून घ्यायला हवे होते.
माफ करा, पण हे अनावश्यक होते. कुठल्याही सार्वजनिक स्थळावर (public अशा अर्थाने) लेख लिहिल्यानंतर उलटसुलट प्रतिसाद येणे हे स्वाभाविक आहे. कारण लेखकाला जे अभिप्रेत आहे, त्याकडे सर्वच व्यक्ति त्याच दृष्टिकोनातून, त्याच भावनेने बघत नाहीत. आणि किमानपक्षी जेव्हा आपल्याला अभिप्रेत असलेला भाव जर वाचकांपर्यंत पोहोचला नसेल, तर एक लेखक म्हणून निदान मी तरी असे मानेन की माझा लेख कुठेतरी कमी पडला.