"लेख कॅट बसच्या सर्वसाधारण माहितीबद्दल नसून मी घेतलेल्या बससेवेच्या अनुभवाविषयी आहे. ती माहिती कुठल्याही दुव्यावर मिळणार नाही. "
हे म्हणणे योग्यच आहे, म्हणूनच त्या लेखाला जास्त अनुभव समृद्ध करता येईल एवढेच म्हणणे होते.
अशी माहिती इथे द्यायला मनोगत म्हणजे विकीपीडिया नाही हे लक्षात घ्या.
मराठी माणसाचे विचार एकमेकांपर्यत नेण्याचे, अनुभव समृद्ध करण्याचे एक संकेतस्थळ आहे असा समज आहे. इथे असणारे शास्त्र, तंत्र, दैनंदिन जीवनातील समस्या, समाजाचा दृष्टीकोन अशा विविध विषयांवरील, विविध प्रकारचे येणारे साहित्य आणि त्याला मिळणारा प्रतिसाद वाचून मनोगत काय आहे त्याचा दाखला मिळावा.
'आपल्याला हा लेख घाईघाईत लिहिला आहे असे वाटत असेल तर हा लेख मी कसा लिहायला हवा होता याचे प्रात्यक्षिक आपण इथे दाखवावे अशी पण आपल्याला विनंती आहे.
क्षमा करा, असे काही लिहीता येणार नाही, येत नाही.
खरे तर माझेच चुकले. इ. स. २००२ मे मध्ये क्लेम्सनला जाण्याआधीच तेथील कॅट बस सेवेचा अनुभव कसा घ्यावा आणि त्यावर भविष्यात काही लिहायचेच झाले तर कसे लिहावे हे त्यावेळीच आपल्याला विचारून घ्यायला हवे होते.'
>>ही वाक्ये अनावश्यक आहेत.