आमच्या इमारतीच्या गच्चीवर घडलेला प्रसंग.
रात्री लाइट्स गेल्याने आम्ही आणि इमारतीतले बरेच इतर लोक गच्चीवर आले होते. आकाश पूर्ण ढगाळलेले होते आणि चंद्र, चांदण्या आणि चांदणे कशाचाच पत्ता नव्हता. त्यावेळी आमच्या शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीला मी सहज विचारले की "काय गं, आज चांदण्या का दिसत नाही आहेत?". नेहमीप्रमाणे मोठ्या माणसासारखा गंभीर चेहरा करून ती म्हणाली "अरे, लाइट्स नाहीयेत ना!!!" मी अवाक आणि बाकी सगळ्यांची हहपुवा.