मित्रांनो,

खरंच खूप दिवस वेळ मिळाला नाही.. माफ करा पण माझाही हा शेवटचाच प्रतिसाद......

जगात विषमता सगळीकडेच आहे, आपण आपल्याकडची सामाजिक विषमता कशी कमी करता येईल ह्याचा विचार केला तर ह्या चर्चेचा फायदा झाला असे मानता येईल.

इतिहासातील चूका मान्य करून मोकळ्या मनाने सगळ्यांनी शिवाजी शेजारी जन्माला यायची वाट न बघता प्रत्येकी एक प्रयत्न करायलाच हवा. आणि पुढच्या पिढीवर तसे संस्कार करणे खूपच गरजेचे आहे. एकमेकांबद्दल आकस संपला की आरक्षणही संपेल. कुणालाच आरक्षित राहणे आवडत नसते....... इच्छाही नसते...

राजकारण्यांकडून अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. थोर नेत्यांचे अनुयायी असणे कठीणच आहे. तोही विषय जावुद्यात.

स्वराज्य आयते मिळाले तर निदान सुराज्यासाठी तरी मेहनत करायची संधी घेऊया..

प्रत्येकाने फक्त एक प्रयत्न करूया.. त्यासाठी मोकळ्या मनाने शुभेच्छांचे प्रतिसाद नक्की पाठवा.

प्रयत्नांची देवाणघेवाण मात्र जरुर करा.....

शुभं भवतु!