प्रभाकरपंत,
कथा छानच जमली आहे. असेच लिहित रहाल तर कट्ट्यावरचे दादा असणारे तुम्ही इथे सुद्धा दादाच रहाल यात शंका नाही.
मी तुमची कथा सर्वप्रथम वाचली असा माझा दावा आहे. गडबडीत प्रतिसाद लिहायचा राहून गेला. त्यानंतर आपल्या सुनबाई, सौ. जया यांनी आपल्याला प्रतिसाद लिहिला व तो आम्हा दोघांसाठी म्हणून एकत्रित प्रतिसाद अशी समजूत करून घेऊन आम्ही लिहिले नाही.
अभार प्रदर्शनात एकही ओळ आमच्यासाठी दिसली नाही तेव्हा लक्षात आले की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ते खरेच.
म्हणून मग आमच्या भावना पोचवण्यासाठी आम्ही हा उशीरा प्रतिसाद देत आहोत.
आपला,
(वाचक) भास्कर
"आजपर्यंत आपल्या लेखना बद्दल ऐकून होते." आमच्या सौं.च्या प्रतिसादातले हे वाक्य बरेच काही सांगून जाते...