सगळ्याच मुलिंचा शहरी, आणि त्यातही सर्व्हिस करणारा नवराच हवा असा "न पटणारा" अट्टाहास असतो.

तो कितपत योग्य आहे हयाचा विचार न करता "तो" पुर्ण करण्याच्या नादात ३-४ वर्षे वाया घालवणार्या मुलिचीं लोकसंख्या भरपुर आहे. शेतात रोजाने काम करणार्या मुलीचींहि अपेक्षा शहराकडेच येण्याची आहे. ती सहाजिकच असेल पण सार्थ मात्र नक्किच नाहि. कारण, मग गावाकडच्या वरांनी काय करायचे?(अर्थात त्यांनी आदिवासी पट्ट्याकडे जायचे. मग आदिवासी मुलांनी काय करायचे? परत हा प्रश्न आलाच.) 

एखांद्या शेतकरयाच्या मुलानं "शहरातिलच बायको पाहिजे" म्हटल्यावर त्याच्याबद्दल केविलवाणं हासु येते ? मग तेच हसु गावाकडची मुलगी शहरीच नवरा पाहिजे म्हटल्यावर का बरे येत नाहि?