सराफांच्या आत्मचरित्माक पुस्तकाचा अगदी मोजक्या पण अर्थवाही शब्द्दात गोषवारा सांगितल्याबद्दल आभार. आपल्या लेखनाच्या शैलीला मी दाद देतो.
सत्तरीच्या दशकात दोन साप्ताहिके अत्यंत वाचनीय, खरे तर वेड लावणारी अशी निघायची. त्यांतील एक मनोहर व दुसरे माणूस. त्याकाळातल्या तरुणांना ही दोन्ही साप्ताहिके नियमितपणे वाचल्याशिवाय चैन पडत नसे. त्यामुळे दत्ता सराफ़, अनिल अवचट, श्री. ग. माजगावकर, माधव मनोहर, रविंद्र पिंगे, ग. वा. बेहरे, पुष्पा भावे ही नावे घरोघरी माहित झाली होती. ह्या सर्वांच्या लेखनाने एका पिढीवर अजब मोहिनी टाकली, त्या माझ्या रम्य दिवसांची आठवण ह्या लेखामुळे झाली. दत्ता सराफांनी रसरंग चालू केले, हे मात्र मला आजवर ठावूक नव्हते. तसेच बहुश्रुतबद्दलही मला काहीही माहित नव्हते.
हे पुस्तक जानेवारी २००६ साली प्रकाशित झाले, तरी त्याबद्दल कुठल्याही मराठी वृतपत्राच्या संकेत स्थळावर वाचल्याचे आठवत नाही, हे थोडेसे खटकणारे आहे. असो.