भाषावार प्रांतरचना ही एक फसलेली गोष्ट आहे

हे कोणत्या आधारे तुम्ही म्हणता? आज जिल्ह्याच्या ठिकाणीचे सर्व सरकारी व्यवहार स्थानिक भाषेत होतात हे भाषावार प्रांतरचनेमुळेच शक्य झाले ना?

सगळ्या भारतीय भाषा संस्कृतोद्भवच आहेत

साफ़ चूक. तामिळ वगैरे तर सोडाच पण अगदी मराठी, गुजराती, हिंदीदेखिल संस्कृतोद्भव नाही. ह्यासंबधीची चर्चा मनोगतावरच पूर्वी झाल्याचे स्मरते.

राष्ट्रभाषा हिंदी म्हटलयावर  

हिंदी ही काही आपली एकमेव राष्ट्रभाषा नव्हे. मराठीदेखिल आपल्या घटनेनुसार राष्ट्रभाषाच आहे.

पुन्हा एकदा...भाषेचा अभिमान असावा... आभिनिवेष नसावा!

जरूर. आपणाला विनासायास (जन्मजात) मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबाबत हे लागू होते. यात भाषेसोबत जात, धर्म, वंश इ.. चा समावेश होतो.