माननीय विकिसाहेब,

त्या १०६ व्या हुतात्म्याचा शोध लागला काय?

मी सुमारे ५ वर्षांपूर्वी ह्या (१०५) हुतात्म्यांच्याबाबत माहिती महाजालावरून जमवत होतो. तेव्हा महाराष्ट्र सरकारच्या संकेत स्थळावर त्यांचा उल्लेखही आढळला नाही. त्यानंतर तसा तो आला असला तर कल्पना नाही, मी अलिकडे परत हे बघितलेले नाही. पण राज्याच्या निर्मितीनंतर सुमारे ४२ वर्षांनंतरची ही परिस्थिती केवळ संतापजनक आहे.