भाषावार प्रांतरचना ही एक फसलेली गोष्ट आहे. आपण मारे कितीही नगारे वाजवले तरी मराठी माणसे म्हणजे नेमके कोण? ( अथवा तेलगु/तामिळ/कन्नड) म्हणजे तरी नेमके काय? जी बोंब मराठीची तीच इतर भाषांची!
भाषावार प्रांतरचना ही फसलेली गोष्ट नाही. भाषावार प्रांतरचनेमुळे प्रादेशिक भाषांच्या विकासाला व त्यांच्या व्यवहारातील वापराला चालना मिळाली. मराठी माणसांचा आयडेंटिटी क्रायसिस बराच जुना आहे. मात्र तेलुगू, तमिळ व कन्नड भाषिकांचा असा गोंधळ होत नाही. मराठीची जितकी बोंब आहे तितकी इतर भाषांची होत नाही.
मराठीपणा जपताना आपण आपला संकुचितपणा जपतो आहोत का?
मराठी माणसाला सगळ्यात जास्त भीती किंवा लाज वाटत असेल तर आपण मराठीचा आग्रह धरला तर आपल्याला इतर लोक संकुचित म्हणतील याची. हिंदी/तमिळ/कन्नड/तेलुगू/बंगाली वगैरे भाषक त्यांच्याच भाषेत बोलतात व इतरांनीही त्याच भाषेमध्ये बोलावे असा आग्रह धरतात. मात्र मराठी माणूस असा आग्रह इतर भाषकांसोबत तर सोडाच तर मराठी भाषकांसोबतही कधी धरत नाही.
तेव्हा भाषेचा अभिमान असावा... आभिनिवेष नसावा. माझ्या मऱ्हाटीचा बोलू कवतुके म्हणणाऱ्या भागवत संप्रदायाने देखील कानडाऊ विठ्ठलु... स्वीकारला आहेच की!
कर्नाटक व महाराष्ट्राची संस्कृती ही फारच एकजिनसी आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कन्नड भाषा येत असलेली हजारो कुटुंबे सापडतील तीच गोष्ट उत्तर कर्नाटकाची आहे तेथे मराठी येत असलेली हजारो कुटुंबे आहेत. अन्न-वस्त्र-निवारा यात कमालीचे साधर्म्य आहे. कर्नाटकातील बहुसंख्य लोकांचा मराठी लोकांप्रमाणेच प्रमुख देव विठ्ठल आहे. तीच गोष्ट पुरणपोळीची!
अवघे विश्वची माझे घर.. म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांना हा संकुचितपणा अपेक्शीत आहे काय?
अवघ्या विश्वाला घर म्हणताना आपली भाषा सोडून देणे अपेक्षित आहे का? त्याच ज्ञानेश्वरांनी अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठीतच रचना केल्या नाहीत का?
भाषेच्या वेगळेपणामुळे आपली संस्कृती वेगळी होत नाही. आणि सगळ्या भारतीय भाषा संस्कृतोद्भवच आहेत.(तामिळ सोडून..निदान तामिळि लोकांना तरी तसे वाटते.. व्यक्तिशः मला जेवढे तामिळ माहीती आहे, त्यावरून तामीळ देखील संस्कृतोद्भव आहे असे वाटते..)
हे पूर्णपणे बरोबर नाही. मराठीवर संस्कृतपेक्षाही तेलुगू व तमिळ भाषेचाही जबरदस्त प्रभाव आहे. तमिळ भाषा ही संस्कृताइतकीच जुनी व संपूर्णपणे वेगळी असल्याचे पुरावे मिळालेले आहेत.
भाषा हा निकष लावायचा तर "अटकेपासून कटकपर्यंतचे" राज्य मराठ्यांचे नव्हते काय? सीमेवरील आक्रमणे मोडून काढणाऱ्या शीखांनी कोणत्या "भाषेचे" रक्षण केले? महाराजांनी राज्यव्यवहार कोष निर्मिला त्याचा हेतू मराठीचा प्रचार करावा हा होता की परकीयांचा राज्यकारभारावरील ठसा पुसावा हा होता?
मराठ्यांनी आपल्या भाषेचा प्रचार करण्यासाठी कधी प्रयत्न केले आहेत का?
राष्ट्रभाषा हिंदी म्हटलयावर इतर भाषांचे महत्त्व कमी होते का?
याचे उत्तर वरती दिले आहे.
पुन्हा एकदा...भाषेचा अभिमान असावा... आभिनिवेष नसावा!
मराठ्यांनी निदान अभिमान ठेवला तरी पुरे.