हुंदका साधा तुझा सांगून गेला,
वेस मौनाची कसा लांघून गेला।.....१
छान. सांगून, रांगून दीर्घ हवेत.

अठवणींचा रंग का गालांवरी,
ऐकतो, आसु जुना रांगुन गेला।.....२
वरच्या ओळीत गालांवरी नंतर एक गुरू हवा होता. आसू ऐवजी अश्रू बरे वाटते.

सोडुनी साथ गेली दूर तरीही,
ना स्मृतिंचा घोळका पांगून गेला।.....३
छान.

'दाद' गझलेला हवी, आसु नको,
'न्याय' शेर कोणता मागून गेला।.....४
खालच्या ओळीत वृत्ताची गडबड आहे.

मी तयांसंगे वहातो प्रश्न सारे,
कोण वेताळां नव्या टांगून गेला।......५

एकंदर पहिली द्विपदी(मतला) सोडल्यास इतर शेरांत सफाईला बराच वाव आहे. वृत्ताचाही भरपूर अभ्यास करावा.