वरदा प्रतिसादाखातर धन्यवाद.

मराठीत विषय प्रथमच पाहताना, लिहीताना अनेक समानार्थी शब्दांची भर पडेल. ती पडू द्यावी असे मला वाटते.

संदलन व विदलन हे शब्द प्रथमतः मी 'धातूंच्या जगात' ह्या मूळ रशियन पुस्तकाच्या मराठी अनुवादात पाहिले आहेत.

प्रमाण शब्द म्हणून पाठ्यपुस्तकात प्रचलित असलेलेच शब्द वापरावेत असा मी प्रयत्न करेन. मात्र इतरही शब्द यथाप्रसंग वापरत राहावेत असे माझे धोरण आहे. त्यामुळे मराठीतील शब्दसंग्रह तोकडा नाही हे सप्रमाण सिद्ध होऊ शकेल.

मात्र मला माहीत नसणाऱ्या पाठ्यपुस्तकीय शब्दांचे ज्ञान मला अवश्य करून द्यावे. कदाचित मी ती पाठ्यपुस्तके कधीही वाचलेली नसण्याची शक्यता दाट आहे. त्याखातर आगाऊ आभार.

"प्राणिद" म्हणजे काय म्हणालात?