बसचा प्रवास आणि ट्रेनचा प्रवास यातील आरक्षण वाद
पर्वा अंधेरी बस मध्ये एक थकलेले ग्रुहस्त स्त्रियांचा आरक्षित जागी बसायला जागा मिळाली म्हणून बसले होते त्यात नुकत्याच चढलेल्या एका मुलीने त्यांना त्या जागेवरून उठवले. त्या ग्रुहस्तांना उठवून त्या मुलीने चूक केली हे तर माझ्यासकट सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होत पण सर्व बस मधल्या माणसांनी बघ्याची भूमिका घेतली कारण दुसरा काही पर्यायच नव्हता तो स्त्रियांचा हक्कच होता.
दुसरा महिन्या अगोदर ट्रेनच्या प्रवासातला अनुभव यात महिला बाळांसह एक कुटुंब चढलं व त्या माणसाने दुसऱ्या माणसाला महिलांसाठी उठून जागा देण्यास विनंती केली यावर त्या बसलेल्या माणसाच म्हणणं मी नाही उठणार मला आताचं बसायला जागा मिळाली आहे आणि बस मध्ये स्त्रियांच्या जागेवर कधी बसायला मिळत का? तेव्हातर हक्काने उठवतात म्हणून मी हक्काने नाही उठणार.यावर आजूबाजूला बसलेल्या सर्व माणसांनी मान डोलवली यात जागेची मागणी करणाऱ्या माणसाने हि तेच केलं.