आखाती मुशाफिरीचे सर्वच भाग अत्यंत रंगतदार आहेत. अभिनंदन.....
मात्र.....
इकडे आखातात येण्यापूर्वी भारतांत ज्या प्रकारची कॉफी, म्हणजे दूध-साखर घातलेली, प्यायलो होतो तशी ते इथे कधी मिळाली नाही. इकडची कॉफी म्हटली की दूध-साखर नसलेली गडद तपकिरी रंगाची आणि कडक कॉफी असायची. दूध तर इथे मिळतच नसे. त्याऐवजी दुधाच्या भुकटी सारखी पांढरी भुकटी कॉफीसाठी वपरायची.
वरील वर्णन पटले नाही. मी १९८१ पासून मस्कतच्या सर्व प्रदेशांमधून हिंडलो-फिरलो आहे. मला वरील प्रमाणे अनुभव कधीच आला नाही. तिथे सर्वत्र गायीचे ताजे, पाश्चराईज्ड, पावडर केलेले सर्व प्रकारचे दूध मिळते. शेळीचे, उंटीणीचेही दूध मिळते. नेसकॉफी, ब्रू, डि-कॅफ इत्यादी कॉफीचे अनेक प्रकार मिळतात. असो.