दुर्गा भागवतांनी एका लेखात म्हटले आहे की त्यांना मावळातील शेतकरी पीक कापणीला येण्याच्या काळात शेतात मध्यभागी एक काटकी पुरताना दिसले. दुर्गाबाईंनी त्या प्रथेचा शोध घेतला तेव्हा असे कळले की फार पूर्वी त्या हंगामात पिकांवर येणाऱ्या पाखरांना हाकलण्यासाठी शेतात एक मोठा खांब पुरत आणि त्यावर मचाण बांधत. कालांतराने त्या खांबाची काटकी झाली!
येथे माझी तपशिलाची चूक झाली. त्या खांबावर मचाण बांधत नसत तर एक कावळा (अथवा तत्सम पक्षी) मारून टांगत असत, ज्यायोगे इतर पक्षांना दहशत बसावी. चुकीबद्दल क्षमस्व.