एक मे च्या निमित्ताने सरकारची 'सकाळ' मधली जाहिरात वाचली का?जाहिरात अशी आहे,

साहित्य, कला, संस्कृती याबरोबरच विकासाच्या विविध क्षेत्रात नवनवे मापदंड निर्माण करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे कौतुकाने पाहिले जाते.

हो तर! शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत आमचाच आख्ख्या देशात मापदंड आहे.पुढे वाचा,

सर्वधर्मसमभावाची जोपासना आणि लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीमधील आघाडी यामुळे हे राज्य साऱ्या देशाचे आशास्थान ठरले आहे.

सगळ्या राज्यांचं आशास्थान महाराष्ट्र म्हणजे देशाचा खेळखंडोबा व्हायला कितीसा वेळ लागणार?

प्रेरक इतिहासाचा वारसा घेऊन उज्ज्वल भविष्याकडे झपाट्याने निघालेल्या महाराष्ट्राला आमचा(म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा बरं का!)मानाचा मुजरा.

राज्य झपाट्याने कुठं निघालंय हे कळण्यासाठी 'सकाळ'चीच ठळक बातमी बघा.

'महा'राष्ट्र...महाभूक...महादारिद्र्य... एक कोटी नागरिक रोज भुकेले...पाच हजार गावे दारिद्र्यात खितपत..

विरोधाभास म्हणतात तो हाच! दुसरं काय?