मौंज करावी का नाही यावर विचार मांडण्यापूर्वी मौंज कोणाची करतात याविषयी माहिती वैदिक धर्मात (हिंदू नव्हे) सांगितल्यानुसार तिन्ही वर्णात आणि दोन्ही लिंगात ती करतात असा उल्लेख आहे‌. शूद्राना मात्र तो अधिकार नाही.( हे माझे मत नाही ,माहिती आहे.)मौंज हा संस्कार आहे तो करावा की न करावा हा प्रत्येकाच्या निवडीचा प्रश्न आहे.मुस्लिमांच्यात सुंता करतात आणि हा संस्कारही पुरुषांपुरताच सीमित नाही ,
दु: खदायक वाटले तरी काही मुस्लिम देशात तो स्त्रियांतर्ही करतात.
    लग्न हाही संस्कारच आहे आणि तोही न करता एकत्र रहाण्यात काय गैर आहे? अशा एका जोडप्याची दूरदर्शनवर मुलाखत पहाण्याचा योग आला.त्यावेळी उपस्थित सर्व सज्जनांनी(त्यात स्त्रियाही होत्या) त्यांचे कौतुक केले,पण त्यानंतर अशा पद्धतीने लग्न न करता रहायची तयारी किती जणांची आहे हे विचारल्यावर मात्र कोणीही होकार दिला नाही.लग्न करताना उच्चारण्यात आलेल्या शपथा किती जण गंभीरपणाने घेतात ? अगोदर किती जणाना त्या लग्नाच्या गोंधळात ऐकू येतात आणि किती जणाना समजतात ?तरीही लग्नाचा हा संस्कार हा मोठा व्यवसायही झाला आहे त्यापुढे मौंज करणाऱ्यांची संख्या अगदी क्षुल्लक असते.मिरवण्याचाच प्रश्न असेल तर कुठल्याही निमित्ताने मिरवण्यात सर्व धर्मीय सर्व जातीय स्त्री पुरुषाना ती हौस असते आणि ती या ना त्या निमित्ताने ते पुरवून घेतात तेव्हा विकींनी या सर्वच विधींना कितपत अर्थ आहे आणि त्याचे गांभीर्य कितीजणाना समजते याचा शोध घ्यावा.