आपल्या समाजात कितीतरी विधी असे आहेत की ते वर्षानुवर्षे चालू आहेत म्हणून तसेच चालू ठेवले जातात. त्याचा अर्थही कित्येकांना ठाऊक नसतो. पण समाजसुधारणा अशी सहज होत नसते. लोक जर खऱ्या अर्थाने विज्ञानाभिमुख झाले आणि प्रत्येक कृती ही स्वतःची बुद्धि वापरुन करु लागले तरच निरर्थक कर्मकांडाला आळा बसेल. कांही मंडळींनी तर सुशिक्षित असुनही डोळ्यावर पट्ट्या बांधल्या आहेत. त्यांना उपदेश करायला जाणे म्हणजे तर पालथ्या घड्यावर पाणी. तेंव्हा हे ज्याचे त्यालाच ठरवू द्यावे. जो समाज काळाबरोबर बदलत नाही तो मागे पडतो हे आपण आपल्याच देशांत जरा आजुबाजुला नजर टाकली तरी दिसून येईल. तेंव्हा सूज्ञास अधिक सांगणे नलगे.