मुंज करू नका. पण जे लोक करतात किंवा करू इछितात त्यांचा मार्ग 'विकृत' आहे हे आपण कुठल्या अधिकाराने म्हणता?
आपण उपस्थित केलेले मुद्दे नक्कीच विचार करण्याजोगे आहेत आणि एक स्वतंत्र विचार म्हणून आदर वाटतो.
"'आमचा पैसा आम्ही कसा खर्च करू हे इतरांनी सांगू नये' हे खुसपट मान्य. ते मी सांगूही इच्छीत नाही. फक्त तो अशा 'विकृत' मार्गांनी खर्च करू नये असे वाटते...."
माझा आक्षेप फक्त वरील विधानाला आहे आणि त्याही पेक्षा त्यामागे असलेल्या मनोवृत्तीला आहे. आम्ही करतो ते सर्व तार्किक, विचारनिष्ठ आणि बाकी करतात ते 'विकृत'. ही ती मनोवृत्ती.