वैदिक धर्मात (हिंदू नव्हे) सांगितल्यानुसार तिन्ही वर्णात आणि दोन्ही लिंगात ती करतात असा उल्लेख आहे‌.

आता हा विधी तिन्ही वर्णात होत नाही हे सर्वांस मान्य असावे. मूळ खांबाची काटकी झाली या उपमेच्या पुष्ट्यर्थ ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

शूद्रांना मात्र तो अधिकार नाही.

तसेच हा खांब मुळातच किडलेला होता आणि ही कीड वाढून तिची काटकी होण्यास मदत झाली हेही स्पष्ट झाले.

सुंता ही एक शस्त्रक्रिया आहे. पुरुषांची सुंता करण्याचे कारण वैद्यकीय आहे. स्त्रियांची "सुंता" करणे या अघोरी प्रकाराला काहीही वैद्यकीय आधार नाही. हा प्रकार प्रामुख्याने आफ्रिकी देशांत आढळून येतो. स्त्रियांना शरीरसुखाचा उपभोग घेता येऊ नये (कारण त्या पुरुषांपेक्षा हीन आहेत) या मानसिकतेतून ती शस्त्रक्रिया करतात. त्याविरुद्ध आता तेथील स्त्री संघटनांनी रान उठवायला सुरुवात केली आहे.

लग्न हा एक कायदेशीर विधी आहे. त्याचा समारंभ करावा की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे. संततीला काही आधार असावा, अन्यथा सर्वत्र औरस-अनौरस संततीचा सुळसुळाट होईल आणि त्यांच्या पालनपोषणाचा प्रश्न उपस्थित होऊ शकेल (कोण कुणाची संतती हे कसे ठरवणार?) या मूळ हेतूने लग्न हा विधी 'कायदेशीर' करण्यात आला. तरीही हा त्या अर्थाने 'मृदू' कायदा आहे. 'रस्त्याच्या डाव्या बाजूनेच वाहन चालवावे' अथवा 'उत्पन्नावर कर भरावा' यासारखा 'कडक' नाही. त्यामुळे हा 'मोडून' काही जणांना 'तसेच' एकत्र राहायचे असेल आणि त्यामुळे कायदाबद्ध समाजाला काही धोका उत्पन्न होणार नसेल तर त्याला समाजाची काही हरकत नाही. तसेच 'नोंदणी' पद्धतीने लग्न करणे हा पर्याय सर्व इच्छुकांना खुला आहे. त्या पद्धतीने लग्न करावे हे माझे वैयक्तिक मत आहे.

मिरवण्याचाच प्रश्न असेल तर कुठल्याही निमित्ताने मिरवण्यात सर्व धर्मीय सर्व जातीय स्त्री पुरुषांना ती हौस असते आणि ती या ना त्या निमित्ताने ते पुरवून घेतात.

ही गोष्ट अगदी मान्य. फक्त हे 'निमित्त' असे आहे की जे विशिष्ट जातींच्या लोकांनाच उपलब्ध आहे म्हणून आक्षेप. अन्यथा 'वाढदिवस', 'जयंती' आणि तत्सम निमित्तांनी जे ओंगळवाणे प्रदर्शन चालते तेही निषेधार्ह आहे असे निसंदिग्धपणे सांगतो.

पुन्हा एकदा - मूळ हेतू हा विचारमंथनाचा होता आणि आहे. तरी कृपया ही चर्चा कोणीही वैयक्तिकरीत्या घेऊ नये ही विनंती.