माझा आक्षेप फक्त वरील विधानाला आहे आणि त्याही पेक्षा त्यामागे असलेल्या मनोवृत्तीला आहे. आम्ही करतो ते सर्व तार्किक, विचारनिष्ठ आणि बाकी करतात ते 'विकृत'. ही ती मनोवृत्ती.
आपला आक्षेप मान्य आहे. माझा 'विकृत' हा शब्द वापरण्यामागचा उद्देश - जी प्रथा (आजच्या तारखेला तरी) समाजात उघड उघड 'आपण आणि ते' असा भेद (तोही एकाच धर्मात; अन्यधर्मीयांना तुच्छ लेखणे हे जवळपास सर्वच धर्मांत आढळते) करते ती 'विकृत' अशा अर्थाने तो शब्द वापरला. तरीही तो शब्द आपल्याला असांसदीक वाटत असेल तर तो मी बिनशर्त मागे घेतो आणि त्या जागी प्रत्येकाने आपापल्या मतांप्रमाणे शब्द योजावा असे प्रतिपादन करतो. मात्र आपण ज्या मनोवृत्तीचा उल्लेख केला आहे त्यातील पहिला भाग आम्ही करतो ते सर्व तार्किक, विचारनिष्ठ मी तेवढ्याच ठामपणे नाकारतो. अशा मनोवृत्तीने चर्चा बंद होईल आणि तसे करण्याचा माझा कुठलाही उद्देश नाही.