खरंच हा लेख मला खूप आवडला.मीसुद्दा फास्टर फेणे चा जबरदस्त फॅन आहे.आजही जवळजवळ सगळे भाग मी कसोशीने जपून ठेवले आहेत.भागवतांचे दुसरे मानसपुत्र
बिपिन बुकलवार(बुकलव्हरचं मराठीकरण),नंदू नवाथे यांची पुस्तकं तुम्ही वाचली आहेत का?ती पण तेवढीच उत्कृष्ट आहेत.
सर आर्थर कॉनन डायल यांनी होम्सच्या एकूण ६१ कथा लिहिल्या आहे. Complete Works of Sherlock Holmes नावाचं एक ठोकळेवजा पुस्तकच माझ्याकडे आहे. तेच तुम्हीही वाचलं असावं.
या कलाकृतींबद्दल काय बोलायचं? त्या एकमेवाद्वितीय आहेत एवढंच आपण म्हणू शकतो.
'चौघीजणी' पुस्तकाबद्दल विचाराल तर शांता शेळकेंचा तो एक उत्कृष्ट अनुवाद आहे. स्वतंत्र निर्मिती वाटण्याइतपत.मुलींचं ते एक all time favourite पुस्तक आहे यात काही वादच नाही.
वर उल्लेखलेलं पाडस पुस्तक मात्र मी अजून वाचलं नाहीये.मिळवून जरुर वाचेन. या लेखाने खूप चांगल्या आठवणींना उजाळा मिळाला.आपल्यासारखंच वाचनवेडं कोणीतरी आहे आणि आपल्या
आवडी पण सारख्याच आहेत ही भावनाच खरं खूप सुखावणारी आहे.
एज ऑफ मायथॉलॉजी या गेमचा वर उल्लेख आलाय.ती तुम्ही खेळलीय का? मुली पण असल्या गेम खेळतात वाटतं! म्हणजे तुम्ही पहिल्याच असाव्यात. ही एक उत्कृष्ट strategic game
आहे.व्यवस्थापन कौशल्य शिकायला ही गेमच हवी.मला पण तिचा उपयोग झालाय. शेवटी पुन्हा एकदा धन्यवाद! लेखन चालू ठेवा.