विसूनानांचा अंदाज बरोबर ! अभिनंदन.त्यावेळी डॉ. नारळीकरांनी (माझ्याप्रमाणे)पहिलीच कथा लिहिली होती आणि आपल्या (प्रसिद्ध)नावामुळे ती निवडली गेली असे होऊ नये म्हणून त्यानी आपले नाव ना. वि. जगताप असे लिहिले होते.(ज. वि. ना. या आद्याक्षरांचा क्रम बदलून ! त्या कथेचे नाव "कृष्णविवर" असे होते,बहुतेकानी ती वाचली असावी.)
माझ्याबाबतीत तसे होण्याची शक्यता नव्हती तरीही 'सृष्टीज्ञान'च्या अंकात प्रसिद्ध करताना संपादकानी माझ्या नावात जरा बदल केला होताच.
प्रासूर कथा लिहिताना परग्रहवासी मानवावर हल्ला करणारे म्हणजे असुर आहेत अशी कल्पना केल्यामुळे तिन्ही नावे तशा प्रकारची होती पण बदललेल्या कथेत परग्रहवासी (प्रतोद म्हणजे चाबूक तसे) पृथ्वीवासीयांना फटकारतो म्हणून नावात बदल केला आहे.