पॉटर मालिकेतला सहावा भाग सोडला तर इतर सर्व भाग मी कॉंप्युटरवरच वाचले. डोळ्यांची अगदी वाट लागली. पण गवसलं बरंच काही!आता सातव्या भागाची वाट बघतोय.
मला तुम्हांला एक पुस्तक सुचवायचंय! नोबेल पारितोषिक विजेते 'विल्यम गोल्डिंग' यांचं 'Lord of the flies' हे पुस्तक तुम्ही वाचलंय का? वाचलं नसेल तर जरुर वाचा.वाचलं असेल तर मत कळवा.
अपघाताने काही मुलं एका निर्जन बेटावर अडकतात.त्या भयाण वास्तव्यात हळूहळू त्यांच्यातल्या आदिम आणि रानटी प्रवृत्ती पुन्हा डोकं वर कशा काढतात याचं चित्रण त्यात आलंय. जरुर वाचा.