प्रेरक इतिहासाचा वारसा घेऊन उज्ज्वल भविष्याकडे झपाट्याने निघालेल्या महाराष्ट्राला आमचा(म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा बरं का!)मानाचा मुजरा.

'प्रेरक इतिहास'? ह्यांच्या काँग्रेसनेच गोळीबार करून १०५ (की १०६) मराठी व्यक्तिंचे प्राण घेतले. आणि म्हणे प्रेरक इतिहास!!!

 राज्य झपाट्याने कुठं निघालंय हे कळण्यासाठी 'सकाळ'चीच ठळक बातमी बघा.

'महा'राष्ट्र...महाभूक...महादारिद्र्य... एक कोटी नागरिक रोज भुकेले...पाच हजार गावे दारिद्र्यात खितपत..

विरोधाभास म्हणतात तो हाच! दुसरं काय?

निर्लज्जं सदा सुखी!