... म्हणजेच आजकालची मुंज. बाकी विधी बहुतांशी सगळे एकतर गौण, कालबाह्य किंवा न समजून घेतलेले. तरीही सर्वजातीपंथधर्मीयांनी मुंजीच्या किंवा शाळेत नाव घातल्याच्या नावाखाली गेट-टुगेदर / जेवणावळी परवडत असेल तर केले तर त्यात काही वाईट नाही. वाढदिवस सुद्धा हल्ली लोक कार्यालये भाड्याने घेऊन करतातच की.

बेताची परिस्थिती असणाऱ्या महागड्या शाळेत मुलांना न पाठवू शकणाऱ्या शेजाऱ्यांसमोर लॉयला किंवा सेंट मिरात शाळाप्रवेशाकरता ईंटर्व्यू देण्याचा गवगवा करणे आणि वाजत गाजत मुंज करणे दोन्हीही तितकेच सामाजिक/आर्थिक दुही माजवणारे आहे परंतु चर्चा मांडणाऱ्यांच्या नजरेतून एकतर हा मुद्दा सुटला आहे किंवा (तथाकथित-) उच्चवर्णीय-विरोधी/पुरोगामी धूळ उडविण्याच्या नादात तो त्यांनी सोयिस्कर रित्या बाजूला ठेवला आहे.