विकि,

लिंक्बद्दल आभार. पण हे संकेतस्थळ ज्या कुण्या 'अट्टाहास मराठीचा' आणि 'भुमिपुत्र सेवामंडळ' ह्यांच्या मालकीचे आहे, त्यांच्याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही.

मी स्वत: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळीपासून, आचार्य अत्रे १९६९ मध्ये निवर्तले, तेव्हापर्यंत दैनिक मराठा नियमितपणे वाचायचो. मला अजूनही १०५ हीच संख्या वाचल्याचे आठवते. आताही मी '१०५ hutatma' असे गूगलवर शोधल्यावर अनेक लिंका मिळाल्या, की जिथे हाच उल्लेख होता. त्यात विकीपेडियाचाही समावेश आहे. उलट, '१०६ hutatma' असे शोधल्यावर एकही link मिळाली नाही.

असो. तपशिलाबद्दल मतभेद असू शकतील. पण ह्या १०५ (६) हुतात्म्यांचा बळी फुकट गेला की काय, असी शंका येण्यासारखी परिस्थिती आता निर्माण झाली आहे, हे क्लेशकारक आहे.

प्रदीप