वा!  किती वर्ष मागे नेलत तुम्ही. मला वाटतं लिखित वाड़्गमय वाचणाऱ्या प्रत्येकाचं जीवन अशा हिरोज् नी  भारलेलं असतं. फाउंटन हेड आणि ऍटलास श्रग्ड (आयन रॅंड) या कादंबऱ्या तर जीवनविषयक तत्त्वज्ञानच बदलून टाकतात. डॉमिनिक प्रमाणे डॅगिनी टॅगर्टही अजून आठवतेच. किशोरवयात बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांनी वेड लावले होते. कांही काळ तर मी झुंजार बनूनच वावरत असे.
अदिती,
अशा अनेक स्मृतींच्या हिंदोळ्यावर नेऊन बसवल्याबद्धल धन्यवाद