दिल्ली परिसरात जुन्या रिक्षांच्या आत किंवा मागे सापडलेली काही रत्ने:
(१) आलू की सब्जी में नींबू निचोड दूं, सनम तेरी याद में खाना-पीना छोड दूं (याचा अर्थ कळला नाही, म्हणून त्या चालकाला विचारायचा प्रयत्न केला. त्याने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिले त्यावरून त्याचा रिक्षा थेट आग्र्याला नेण्याचा इरादा दिसला. ज्ञानप्राप्ती न करता घाईघाईत खाली उतरलो)
(२) तितलियां शहद पीती हैं, भंवरे बदनाम होते हैं
दुनिया शराब पीती हैं, ड्रायव्हर बदनाम होते है
(३) बुरी नजरवाले, तेरा भी भला हो
आता आपल्याकडचे कांही
(१) एका विटांच्या ट्रकच्या मागे: दीप माझ्या स्मृतींचा तू सदैव सांभाळ, कोण जाणे आयुष्याची केव्हा होईल संध्याकाळ
(२) एका वाळूच्या ट्रकच्या मागे, पुणे-मुंबई रस्त्यावर
चल चल ग माझ्या वाघिनी (हे अशुद्ध असले तरी तीन शब्द अशुद्ध लिहिण्यापेक्षा एक शब्द अशुद्ध लिहिलेला बरा असा विचार करणारा तो कवी थोरच म्हणावा लागेल)
तुला पळविले किति जरी मालकांनी
नको राग धरू मनी
सुरक्षित ठेव माझा कुंकवाचा धनी