श्री. भास्कर केन्डे,
अभार प्रदर्शनात एकही ओळ आमच्यासाठी दिसली नाही तेव्हा लक्षात आले की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ते खरेच.
आपण लाजवता आहात मला. सौ. जया केन्डे आणि आपले आडनावसाधर्म्य पाहून आपले कांही नाते असावे असे वाटले होते परंतु, खात्री नसल्यामुळे कांही भाष्य केले नाही. आपण नेहमीच माझ्या (भले-बुरे असेल त्या) लिखाणावर अभिप्राय देवून मला प्रोत्साहीत केले आहे. दोषारोप, शिव्या-शाप, दु:ख आणि खडतर संकटं यांनी भरलेल्या आजकालच्या आयुष्यात 'कौतुकाचे दोन शब्द' सर्व, तथाकथित अपरिमित, दु:खांना डाव्या हाताने बाजूस सारून मनाच्या कोपर्यात, अडगळीत टाकून देतात आणि नविन दिवसाच्या नविन आयुष्यासाठी पाटी कोरी करकरीत करून देतात. मी छाती भरून श्वास घेतो नवजीवन बहाल करणार्या 'भास्करा'स कोटी-कोटी प्रणाम करतो.