मराठी पुस्तकांना सोनियाचे दिवस आले आहेत, हे सत्य आहे. मरठी पुस्तके विकत घेणासाठी वाचक आहेत, पण वाईट हे की ही मागणी पुरी करता येईल इतकी पुस्तके बजारात नाहीत.

काही दिवसांपुर्वी "क्रोसवर्ड" च्या पुणे येथील शाखेतही मला असाच एक अनुभव आला. विश्वास पाटलांच्या "संभाजी" ची एक प्रत मागीतली तेव्हा, वाहतुकीमध्ये खराब झाल्यामुळे "स्क्रॅप स्टॉक" मध्ये एक प्रत आहे, व ती देता येईल असे सांगितले. मी बघावयास मगितल्यावर, मुखपृष्ट बरोबर अर्ध्यातून फाटलेली, धुळीमध्ये माखलेली, बहोतश्या पनांचे दुमदलेले कोपरे अश्या अवस्थेतिल एक प्रत मला आणुन दाखवली. पुस्तकाची ती दुरावस्था पाहुन मनं खिन्न तर झाले, पण मरठी पुस्तकांचा वाढता खप पाहुन आनंदही झाला.

अखेर "आऊट ऑफ प्रींट" असणे, हे चांगले दिवस आल्यचेच लक्षण म्हणायला पहिजे. नही का?