"थोडक्यात समाजातील प्रत्येक घटकामध्ये बंधुभाव निर्माण करण्याकरता ज्ञानी लोकानी धर्म ही संकल्पना उपयोगात आणली."
हा उद्देश चांगला असला तरी त्यासाठी वेगवेगळ्या नावांच्या वेगवेगळ्या धर्मांची कधीच आवश्यकता नव्हती. प्राणीमात्रांमध्ये असले धर्म नसतात. तरीही ते गुण्यागोविंदाने राहतांना दिसतात. प्रत्यक्षात बहुतेक धर्ममार्तंडांनी धर्म या संकल्पनेचा उपयोग समाजातील घटकांमध्ये भेदभाव करून त्यांत "तुझे-माझे" ही भावना निर्माण केली असेच दिसते. त्यामुळेच कदाचित बंधुभाव सांगणाऱ्या लोकांचा "संत" हा एक वेगळा वर्ग़ निर्माण झाला व बहुतेक संतांचा तत्कालिन धर्मनिष्ठांनी छळच केला असा इतिहास आहे. त्यामुळे धर्म या संकल्पनेचा उद्देश पूर्णपणे साध्य झाला नाही असे मला वाटते.