इंग्रजांनी आपल्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई, मद्रास, बंगाल, पंजाब वगैरे इलाखे निर्माण करून त्यात भारताची विभागणी केली होती. त्यांशिवाय अनेक संस्थाने होती. स्वतंत्र व लोकशाहीवर आधरलेले भारत हे राष्ट्र झाल्यावर त्यातील घटकांची पुनर्रचना करणे हे आवश्यकच होते. त्यासाठी भाषा हा एक सोयिस्कर निकष वापरला गेला. हिंदी भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश फारच विस्तृत असल्याकारणाने त्याचे अनेक राज्यांत विभाजन केले गेले.
सर्व प्रशासनिक तसेच सामाजिक बाबींचा विचार करता भाषावार प्रांतरचना इंग्रजी अंमलाखालील विभागणीपेक्षा निश्चितपणे चांगली ठरली असेच मला वाटते.