अरे.. किती वर्षं झाली .. शाळेबद्दल बोलून! चर्चा सुरु केल्याबद्दल धन्यवाद! शाळेबद्दलची चर्चा आरोळ्यांशिवाय चांगली वाटत नाही... "पंचकन्या पंचकन्या भारतमातेच्या ... आम्ही सुकन्या आम्ही सुकन्या अहिल्यदेविच्या!", "एक दोन तीन चार - अहिल्यदेवी आहे हुशार, पाच सहा सात आठ - अहिल्यदेविची कॉलर ताठ, नऊ दहा अकरा बारा - अहिल्यदेविचा आहे दरारा!!"
अहिल्यादेवी ही उत्कृष्ट शाळा आहे या बद्दल शंका घेणारे केवळ 'ढ' ठरतील! आमच्या शाळेतील मुलींना सरळ आणि गरीब म्हटल्याबद्दल धन्यवाद! पण मला हे कबूल करावं लागेल की या पूर्वी मला ही विशेषणं कोणीही लावली नाहीत!...
सगळ्या शाळांमधे सगळे नमुने असतात.. तुमची गाठ साध्यांशी पडलेली दिसते..