१. काही लोक मुंज विधी करतात ही माझ्या लेखी किरकोळ गोष्टच आहे. त्यात काही अधिक लोकांची भर पडली किंवा काही कमी झाले तरी माझ्यालेखी ती गोष्ट किरकोळच राहणार.

२. गवगव्यात काय कळले नाही? दुसऱ्याला खालच्या दर्जाचा आहेस हे दाखवून द्यायचा हिडीस प्रकार मुहूर्त काढून केला किंवा न केला तरी सारखाच. मुहूर्त न काढून केल्यास असल्याप्रकारचे स्वागत करणारे नव-सनातनीच.

३. 'तथाकथित', 'धूळ उडविणे', 'सोयिस्कर रित्या' हे शब्द खचितच वैयक्तिक पातळीवर टीकेकरिता मी वापरले आहेत. कारण चर्चा मांडणाऱ्याची मानसिकता चर्चेद्वारे एका विधीपेक्षा एका समाज घटकास जबाबदार धरण्याची आहे असा माझा आरोप आहे. आणि तो आरोप लेखकाच्या खालील अंतर्विरोधपूर्ण धमकीवजा आवाहनातून स्पष्ट होतो ... "शेवटी, आम्ही मुलींचीही मुंज करायला तयार आहोत असा खुळचट प्रतिसाद देण्याआधी मानवजातीतल्या सर्वांची मुंज करायला (स्व-खर्चाने नव्हे) तुमची तयारी आहे का? आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे आजच्या काळात ह्या विधीला काही अर्थ आहे काय? या प्रश्नांची उत्तरे द्यावीत." [ परवानगी देणारे हे कोण? आणि मागणी करणाऱ्यांना त्यांची स्वीकृती का हवी? ज्यांना मुंज विधी म्हणून हवी आहे त्यांच्या कडे मुंज करवून घ्यायचे बरेच प्रकार आहेत जसे ज्याला विधी करता येतो त्याच्याकडून करवून घेऊन, स्वतः: पुस्तक वाचून, कॅसेट लावून, आर्यसमाजींकडून (ते जातपात विचारीत नाहीत) करवून. सन्जोपराव म्हणतात त्याप्रमाणे जर विधीच फोल/निरर्थक वाटत असेल तर त्या विचारांच्या व्यक्तींनी सन्जोपराव म्हणतात तसे स्वस्थ राहावे, सध्या आजूबाजूला घडणारे बहुतांशविधी हे कमी होत जाणाऱ्या उरल्यासुरल्या परंपरावादी व्यक्तींची परंपरा जपण्याची शेवटची धडपड असावी, हे लोक काही ऐकायच्या पलीकडे आहेत, पाठमोरे आहेत, त्यांना वाकुल्या दाखवून काही साध्य नाही. बाकी ओटी भरणे, कुंकू लावणे, निरांजन ओवाळणे, घंटा वाजवणे, मूर्तीपूजा असे बरेच दैनंदिन विधी घेऊन असल्याच चर्चा करता येतील. काही लोक बहुदा रोज सकाळी उठून आज कुठल्या जुन्या रीतीबद्दल घालून पाडून लिहू-बोलू की जेणे करून एखाद्या जाती/धर्मा विशेषाचा अधिकाधिक अपमान करता येईल ? गोमूत्राचा उपयोग, सती, मुंज, लग्न विधी की अजून काही? असा विचार करून दिवस सुरू करतात त्यांपैकी तुम्ही एक; असा मला अजून एक वैयक्तिक पातळीवरील आरोप करावासा वाटतो.]

४. अरे वा? मुंजींनी सामाजिक दुफळी माजतेय म्हणे? असले निष्कर्ष हा सामाजिक असमानताविरोधी सुराचा कहर आहे. उलट आपोआप गाजवजा न करता रुढी गळून पडत आहेत असे सन्जोपराव, हॅम्लेट, केकावा वैगेरे प्रतिसादावरून जाणवते. तुम्ही उद्या एक पूजा करतो आणि दुसरा नमाज पढतो म्हणून सगळ्यांनी नमाज पढा म्हणाल वर 'सगळ्यांनी नमाज पढला तर तुम्हाला चालेल का, नमाज विधीला काही अर्थ आहे का?' असे अंतर्विरोधपूर्ण प्रश्न विचाराल.

प्रकाशकांस माझे प्रतिसाद गैर वाटत असतील तर ते उडविण्यास ते समर्थ आहेतच पण उडविताना त्यांनी एकतर या चर्चेवरील माझे सर्व प्रतिसाद उडवावेत अथवा सर्व ठेवावेत अशी विनंती.